वर्धा : दीड वर्षीय बिबट आज दुपारी येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात घुसला अन् सर्वत्र तारांबळ उडाली.परिसरातील त्याचा वावर लक्षात येताच विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी मिरगे यांनी पीपल्स फॉर अँनिमलचे आशिष गोस्वामी यांना सूचित केले.त्यांनी आपल्या बचाव चमुसह घटनास्थळी धाव घेतली. बिबट पकडण्यास बरीच धावपळ करावी लागली.
वन व पोलीस खात्याचे अधिकारी दरम्यान या ठिकाणी येवून पोहचले.झुडपात दडलेल्या बिबट्यस शेवटी गोळीने बेशुद्ध करण्यात आले.त्यास नंतर जाळीत पकडुन गोस्वामी यांच्या करुणाश्रम या संस्थेत नेण्यात आले.हा नर बिबट १८ महिन्याचा आहे.तो तापाने फणफणत असून १०५ अंश एवढा त्यास ताप आहे.त्याला कावीळ झाल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच्या रक्ताचे नमुने नागपूरला पाठविण्यात आले आहे.चार दिवसापासून तो या परिसरात फिरत होता.त्याने एका शेळीचा फडशा पण पाडला, अशी माहिती मिळाली.तूर्तास हा बिबट करुणा श्रम येथे उपचार घेत आहे.