गोंदिया : गोंदिया तालुक्यातील महालगाव येथील निवासी व भारतीय सैन्य दलात कार्यरत लोधी देवीप्रसाद राधेलाल (मुन्ना) लिल्हारे (वय ४१) यांचे आज ३ ऑक्टोबरला सकाळी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. एक महिन्याच्या आत गोंदिया जिल्ह्यातील लोधी समाजाच्या दोन विरपुत्रांचे निधन झाले. देवीप्रसाद यांच्या निधनाने गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. देवीप्रसाद हे हिमाचल प्रदेश येथील सिमला येथे सैन्य दलात हवालदार होते. आज सकाळी कवायती दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर बुधवार ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या स्वगावी महालगाव येथे येईल. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा