नागपूर :  एकाच भूखंडाची दोघांना विक्री करून भूविकासकाने एका महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी निर्मला श्रीकृष्ण मातीखाये (५९) रा. गणेशपूर, भंडारा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. प्रकाश संतोष मोहोड (४४) रा. झिंगाबाई टाकळी असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी प्रकाश मोहोड याने गोधनी रोडवर सफल लॅन्ड डेव्हलपर्स नावाने कार्यालय उघडले होते. निर्मलाचे पती श्रीकृष्ण हे महावितरण कंपनीत काम करीत होते. १९९६ मध्ये श्रीकृष्ण आणि निर्मला यांनी सफल लॅन्ड डेव्हलपर्सकडून मौजा गोधनी रेल्वे परिसरात भूखंड खरेदी केला होता. आरोपी मोहोडने त्यांना त्याच वेळी रजिस्ट्री आणि ताबाही दिला होता. त्यानंतरही २००९ मध्ये मोहोड याने तोच भूखंड अजनीच्या रेल्वे क्वॉर्टर येथे राहणाऱ्या सय्यद जावेद अली यांना विकला. ग्रामीणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांना विक्रीपत्र करून दिले. जावेद यांनी भूखंड आपल्या ताब्यात घेतला. काही दिवसांपूर्वी निर्मला नागपुरात आल्या. जावेदला विचारपूस केली असता सर्व प्रकार समोर आला. त्यांनी प्रकरणाची तक्रार मानकापूर पोलिसात केली. तपासानंतर पोलिसांनी मोहोड विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

crime Uttar pradesh
क्रूरतेची परिसीमा! तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, डोळेही काढले; कुटुंबीयांचा पोलिसांवर गंभीर आरोप!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune crime news
महिलेची फसवणूक करणारा पोलीस शिपाई निलंबित, विवाहास नकार देऊन पाच लाख, सोन्याच्या दागिन्यांचा अपहार
pune college admission fraud
पुणे: महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
woman senior citizen , Fraud , fear of action,
कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक, ‘डिजिटल ॲरेस्ट’ची धमकी
pune fraud latest news in marathi
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची ३२ लाखांची फसवणूक
Fraud of pretext of loan approval Pune
पिंपरी: कर्ज मंजुरीच्या बहाण्याने सव्वा कोटीची फसवणूक
Karnataka High Court's ruling clarifies that consent for sex does not equate to permission for assault.
“लैंगिक संबंध ठेवण्याची संमती म्हणजे महिलेवर…”, हवालदाराच्या पत्नीचे पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप

हेही वाचा >>>अंगणवाडी मदतनीसांच्या १४ हजार पदांसाठी लवकरच भरती, काय आहे प्रक्रिया बघा….

बिल्डरनेही लावला चुना

अशाच प्रकारचे दुसरे प्रकरण हुडकेश्वर ठाण्यांतर्गत ही पुढे आले आहे. पोलिसांनी शैलेश रामराव सुपलकर (३०) च्या तक्रारीवरून आरोपी बिल्डरविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्रमोद वासुदेव हर्षे (रा. आकाश पॅलेस अपार्टमेंट, अयोध्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी प्रमोदने आकाश पॅलेस येथील सदनिका नरेंद्र भांडारकर नावाच्या व्यक्तीला विकला होता. काही दिवसांनी त्याच फ्लॅटचा सौदा त्याने शैलेश याच्याशीही केला. १९ एप्रिल २०२४ रोजी विक्री करारनामा करून देत शैलेशकडून ७ लाख रुपये घेतले. सदनिकेची कागदपत्रे तपासली असता  फसवणूक झाल्याचे समजले. त्याने प्रमोदला पैसे परत मागितले असता त्याने नकार दिला. शैलेशने घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी आरोपी प्रमोदवर गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

गुप्तीने १५ वार करीत खून करण्याच प्रयत्न

नागपूर : मित्राला वापरण्यासाठी दिलेली दुचाकी चोरीस गेल्याचा राग मनात ठेवून त्याच्यावर गुप्तीने १५ वार करत जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. प्रफुल्ल महादेवराव दांडेकर (३३, आराधना सोसायटी, गोधनी रेल्वे), असे जखमीचे नाव आहे. तर दीप हरी खरे (४०, कलेक्टर कॉलनी, गोधनी), असे आरोपीचे नाव आहे. दीड वर्षाअगोदर दीपने प्रफुल्लला दुचाकी दिली होती व ती चोरीस गेली. तेव्हापासून दोन्ही मित्रांमध्ये बोलणे बंद होते. दीपने प्रफुल्लला गाडीचे पैसे मागितले होते व त्यावरून त्यांचा वाद झाला होता. १५ जुलै रोजी प्रफुल्ल हा इब्राहीम जंगू शेख या त्याच्या मित्राकडे गप्पा मारण्यासाठी गेला. तेथे दीपदेखील पोहोचला. काही वेळाने तो निघून गेला. प्रफुल्लने इब्राहीमला घरी सोडून देण्यास सांगितले. रात्री ११ वाजताच्या सुमारास दोघेही दुचाकीवर जात असताना साखरे लेआऊट येथे एका गल्लीतून दीप बाहेर आला व त्याने दुचाकीला अडवले. माझ्या गाडीचे पैसे अद्याप तू दिलेले नाहीस, आज तुझा जीवच घेतो, असे म्हणत त्याने प्रफुल्लवर हातातील गुप्तीने वार करण्यास सुरुवात केले. त्याने प्रफुल्लच्या पाठ व छातीवर वार केले. इब्राहीमने दीपला अडविले व त्याने प्रफुल्लच्या भावाला बोलविले. त्यानंतर दीप घटनास्थळावरून फरार झाला. दोघेही प्रफुल्लला एका खासगी इस्पितळात घेऊन गेले व इब्राहीमने मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. पोलिसांनी आरोपी दीपविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पानठेलाचालकाला खंडणीची मागणी

नागपूर : रेल्वे स्थानकाजवळील एका पानठेलाचालकाला गुंडाने खंडणीची मागणी केली. जर खंडणी दिली नाही तर जिवे मारण्याचीदेखील धमकी दिली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. सौरभ ऊर्फ आंबा विलास आंबटकर (२९, नेहरूनगर, सक्करदरा), असे आरोपीचे नाव आहे. मिलवीन इब्राहीम जोसेफ (२४, बिशप चाळ, खलासी लाईन, सदर) याचा जयस्तंभ चौकात पानठेला आहे. २२ जूनला रात्री ११ वाजता सौरभने त्याला फोन करून पैशांची मागणी केली होती. जर पैसे दिले नाही तर पानठेला लावू देणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी सौरभ पानठेल्यावर गेला व चाकूचा धाक दाखवत ३० हजार रुपये खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे हादरलेल्या जोसेफने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी सौरभविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Story img Loader