वर्धा: दारूबंदी असलेला वर्धा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो. काँग्रेस नेते तोच निकष लावत वाटाघाटीत वर्धेची जागा मागून घेतात. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर नीतिमत्ता पाळण्याची जबाबदारी काकणभर अधिकच. पण या प्रकरणात शहर काँग्रेस उपाध्यक्ष असलेल्या नेत्यानेच दारूचे दुकान थाटले.

सिंदी रेल्वे येथील गजानन महादेव खंडाळे हे काँग्रेस नेते आहेत. त्यांच्या घरी दारू विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी धाड टाकली. त्यात देशी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलीसांनी त्यास अटक करीत माल जप्त केला.

हेही वाचा… ऑगस्टमध्येही पावसाने केला भ्रमनिरास, सात सप्टेंबरनंतर जोर धरणार?

या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे. जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर हे म्हणाले की गुन्हे दाखल झाले असेल तर पक्ष कारवाई करेल. पोलीस निरीक्षक वंदना सोनुने तसेच राजू सोनपित्रे, आनंद भस्मे, प्रशांत श्रीवास्तव, संदेश सोयाम,अमोल पिंपलकर, प्रदीप मस्के,उमेश खमणकर यांच्या चमूने ही कारवाई केली.

Story img Loader