लोकसत्ता टीम
चंद्रपूर : कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर – आलापल्ली मार्गावरील झरण गावाजवळ एका वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा… राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीने नागपूरकरांसाठी एप्रिल ‘ताप’दायक
हेही वाचा… नागपूर : जाहिरात फलकांचा थकीत कर न भरल्यास कारवाई
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ वाजताच्या सुमारास या मार्गावरून एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने गेले. या वाहनाने झरण गावाच्या अगदी जवळ रस्ता पार करणाऱ्या बिबट्याला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या वाहनाचा शोध घेतला जात आहे.