गडचिरोली वैरागडपासून एक किमी अंतरावर असलेल्या मेंढेबोडी मार्गावर शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने बिबट्याला धडक दिली. यात बिबट्या जागीच ठार झाला.शुक्रवारपासून वैरागड परिसरात बिबट्याचा वावर होता. शनिवारी रात्री अज्ञात चारचाकी वाहनाने बिबट्याला धडक दिली.

हेही वाचा >>>नागपूर : तीन हजार किलोचा चिवडा ; विश्वविक्रमाला सुरूवात

ही धडक एवढी जोरदार होती की बिबट्या जागीच ठार झाला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह आरमोरी वनपरिक्षेत्र कार्यालयात पाठविला. धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

Story img Loader