नागपूर : नागपूरकर माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आपण या नागपूर नगरीचे भूषण. महापौर झालात तेव्हाही आणि मुख्यमंत्र्यांचे मुकूट आपल्या शिरावर विराजमान झाले तेव्हाही. खुप सारी स्वप्न त्यावेळी नागपूरकरांनी पाहिलेली. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची अडचण तुम्ही जाणाल, हा विश्वासच नव्हे तर आत्मविश्वास आम्हा नागपूकरांना होता. मात्र, कालांतराने ही अपेक्षा फोल ठरू लागलेली. आपण शहरातून बाहेर पडलात आणि आपल्या प्राधान्यक्रमातून नागपूरकर हळूहळू दूर होऊ लागले. आपण उपमुख्यमंत्री झालात आणि नागपूरकरांना जणू आपण वाळीतच टाकले. आपल्यासाठी राज्याचे राजकारण महत्त्वाचे ठरले आणि नागपूरकरांच्या समस्या जणू आपण गुंडाळून ठेवल्या. आता हेच बघा ना! दक्षिण-पश्चिम हा आपला मतदारसंघ. आम्हाला कोणे एकेकाळी सार्थ अभिमान होता, की आम्ही देवेंद्र फडणविसांच्या मतदारसंघातील आहोत. आता हा सार्थ अभिमान पार धूळीला मिळाला, नव्हे तो पार खड्ड्यात गेला. गेल्या काही वर्षांपासून राज्याची ही उपराजधानी पावसाळा आला म्हणजेच नाही तर अवकाळी पावसातही अक्षरश: तुंबतेय. या शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्याचे स्वप्न आपण पाहीले. याआधीही आपण जी जी स्वप्न पाहिलीत ती पूर्ण केली. गोरेवाडा झू हे आपलेच स्वप्न होते.

त्याला वेळ नक्की लागला, पण ते पूर्ण झाले. मात्र, स्मार्ट सिटीच्या स्वप्नात सारे काही विस्कळीतच झाले. जिकडे तिकडे आपल्या मतदार संघात सिमेंट रस्त्यांचे जाळे पसरवले जात आहे, पण हे खरेच गरजेचे होते का? आणि असेलही तर निकष धाब्यावर बसवून बांधले जाणारे हे रस्ते नागपूरकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. आता हेच बघा ना! विवेकानंद स्मारक ते अंबाझरी टी पाॅईंट हा मार्ग गेल्या महिनाभरापासून बंद केलाय. कारण काय तर नाल्याची रुंदी वाढवायची. हे म्हणजे महापालिकेला उशीर सुचलेले शहाणपण. या कामासाठी किमान सहा ते आठ महिने हा मार्ग पूर्णपणे बंद केलाय आणि हलकी व जड अशी सर्व वाहतूक गांधीनगर चौक ते अभ्यंकरनगर चौक आणि मग माटे चौकामार्गे वळती करण्यात आली. हा वळसा घालून दिलेला पर्यायी मार्गही मान्य, पण निदान हा पर्यायी मार्ग तरी सुखाचा असावा ना! तर ते देखील नाही. या संपूर्ण मार्गावर खड्ड्यांची अक्षरश: शर्यत लागलेली. जणू तू मोठा की मी मोठा असे करत वाढलेले खड्डे संपूर्ण मार्गावर. त्यामुळे रस्ता शोधायचा कसा हाच प्रश्न नागपूरकरांना पडलेला. आता तर पावसानेही जोर धरलाय आणि पाणी भरलेले हे खड्डे ओलांडून समोर जायचे म्हणजे मृत्यूला आलिंगण देण्यासारखे. एखादेवेळी ते ही ठीक, पण ज्यांच्यासाठी हा रोजचा मार्ग झालाय, त्यांचे काय ना! येथे आता फक्त एखाद्याला श्रद्धांजली वाहने तेच काय बाकी आहे फक्त. आपण उपमुख्यमंत्री आहात, नागपूरातही आपण फार काळ राहात नाहीत. आलात तरी आपले राजकीय कार्यक्रम असतात, आपला ताफाही सुरक्षित मार्गावरून जातो. पण तुमच्यावर विश्वास टाकणाऱ्या या जनतेचे काय? आपल्या मतदारसंघातील हे नागरिक तर थेट दररोज यमदुताच्या दारातून जातात. आपण दखल घ्याल, हीच या नागपूरकरांची अपेक्षा.

Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
yamuna revier
यमुनेच्या पाण्यावरून वादाचे तरंग; केजरीवाल यांच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : “वाळूच्या गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही, सगळे आपलेच लोक”, राधाकृष्ण विखे पाटलांचं धक्कादायक विधान
A youth from Bihar files a case against Rahul Gandhi seeking Rs 250 as compensation, highlighting the ongoing legal dispute.
Rahul Gandhi : “ते विधान ऐकून धक्का बसला अन् हातातून दुधाची बादली पडली”, २५० रूपयांसाठी राहुल गांधींविरोधात तरुणाची याचिका
challenge for new guardian minister pankaj bhoyar is to manage equal colleagues
नव्या पालकमंत्र्यास समतुल्य सहकारी सांभाळण्याचेच आव्हान

-नागपूरकर

Story img Loader