नागपूर : नागपूरकर माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आपण या नागपूर नगरीचे भूषण. महापौर झालात तेव्हाही आणि मुख्यमंत्र्यांचे मुकूट आपल्या शिरावर विराजमान झाले तेव्हाही. खुप सारी स्वप्न त्यावेळी नागपूरकरांनी पाहिलेली. एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची अडचण तुम्ही जाणाल, हा विश्वासच नव्हे तर आत्मविश्वास आम्हा नागपूकरांना होता. मात्र, कालांतराने ही अपेक्षा फोल ठरू लागलेली. आपण शहरातून बाहेर पडलात आणि आपल्या प्राधान्यक्रमातून नागपूरकर हळूहळू दूर होऊ लागले. आपण उपमुख्यमंत्री झालात आणि नागपूरकरांना जणू आपण वाळीतच टाकले. आपल्यासाठी राज्याचे राजकारण महत्त्वाचे ठरले आणि नागपूरकरांच्या समस्या जणू आपण गुंडाळून ठेवल्या. आता हेच बघा ना! दक्षिण-पश्चिम हा आपला मतदारसंघ. आम्हाला कोणे एकेकाळी सार्थ अभिमान होता, की आम्ही देवेंद्र फडणविसांच्या मतदारसंघातील आहोत. आता हा सार्थ अभिमान पार धूळीला मिळाला, नव्हे तो पार खड्ड्यात गेला. गेल्या काही वर्षांपासून राज्याची ही उपराजधानी पावसाळा आला म्हणजेच नाही तर अवकाळी पावसातही अक्षरश: तुंबतेय. या शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्याचे स्वप्न आपण पाहीले. याआधीही आपण जी जी स्वप्न पाहिलीत ती पूर्ण केली. गोरेवाडा झू हे आपलेच स्वप्न होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा