हक्काच्या ‘बीपीएल’ कार्डसाठी आठ दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या वृद्ध दांपत्याची कुणीही दखल न घेतल्याने आज सायंकाळी ६ वाजता आत्मदहन करणार असे पत्र त्यांनी तहसीलदारांना पाठविले. मात्र, तहसीलदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले असून त्यांचा मोबाईल बंद झाला आहे.
अन्यायाविरोधात ग्राहक मंचाकडे दाद मागण्यासाठी गेलेल्या ‘बीपीएल’ कार्ड धारकांना ग्राहक मंचाच्या निकालाने दिलासा मिळाला. राशन दुकानदाराकडून नुकसाभरपाई देण्याचे तसेच पूर्वीप्रमाणे लाभ देण्यात यावा असा निर्णय देण्यात आला. मात्र, सात महिने लोटूनही मोहाडी तहसीलदार यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चंद्रपुरात २० दशलक्ष टन क्षमतेची पेट्रोल रिफायनरी ; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांची घोषणा

आपल्या हक्कासाठी मागील आठ दिवसापासून हे लाभार्थी उपोषण करत आहेत. तरीही मोहाडीच्या तहसीलदारानी याची साधी दखलही घेतली नाही.प्रकरण असे की, पालोरा येथील नत्थू सिताराम बुरडे यांची बीपीएल शिधापत्रिका १९९७ पासून निलकंठ गोमासे ह्या राशन दुकानदाराकडे होती . २०१४ मध्ये नत्थु बुरडे यांची पिवळी शिधापत्रिका जीर्ण झाल्याने दुय्यम शिधापत्रीका देण्यात आली होती. मात्र, यावेळी दुकानदार शारदा निलकंठ गोमासे यांनी धान्य देणे अचानक बंद केले. कारण विचारले असता शासनाने धान्य देणे बंद केले असे सांगण्यात आले. यावर लाभार्थ्याने माहिती अधिकारात विचारणा केली असता राशन दुकानदाराने डी.वन. रजिस्टरवर बदल केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला.

हेही वाचा >>> अमरावती : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याची जमावाने केली हत्या ; अमरावती जिल्ह्यातील थरारक घटना

लाभार्थ्यांने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग भंडारा यांच्या न्यायालयात दाद मागितली. यावर न्यायालयाने १८ फेब्रुवारी २०२२ रोजी बीपीएल लाभार्थ्याच्या बाजूने निकाल देत मोहाडी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर दंड ठोठावला. शिवाय बाबत बीपीएल लाभार्थ्यांचे कार्ड तयार त्यांना धान्य देण्याचे आदेश दिले.मात्र, ७ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही शिधापत्रिका आणि दंड जमा करण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदार वंदना बुरडे व देवदास बुरडे दाम्पत्य १२ सप्टेंबरपासून पालोरा येथे आमरण उपोषणास बसले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A letter was given to the tehsildar that the old couple who were on hunger strike would commit self immolation today amy