नागपूर: गेल्या काही दिवसांपासून बारावी आणि दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी विविध भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत. रेल्वे विभागात देखील मेगा भरती सुरू आहे. ही मेगा भरती शिकाऊ उमेदवारांसाठी आहे. वायुसेनेत देखील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
भारतीय लष्कराने एक अत्यंत मोठा निर्णय घेत थेट अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरूवात केली. सुरूवातीला या निर्णयाचा जोरदार विरोध देखील झाला. आता भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. हा बदल २०२४ -२५ च्या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे. नुकताच यासंदर्भातील अधिसूचनाही ही प्रसिद्ध करण्यात आलीये.
हेही वाचा…विदर्भात हजारो ट्रक पुन्हा थांबले! ‘हिट ॲण्ड रन’विरोधात संप
विशेष म्हणजे हा नवा नियम लिपिक आणि स्टोअरकीपर पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलाय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे हा नियम इतर भरती प्रक्रियेसाठी लागू नसणार आहे. सेना लिपिक आणि स्टोअरकीपर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी हा नियम असेल. यामध्ये या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागणार आहे.
अगोदरच्या नियमानुसार टायपिंग चाचणी देण्याची गरज नव्हती. मात्र, आता त्या नियमामध्ये बदल करण्यात आलाय. या टायपिंग चाचणीमध्ये उमेदवाराला हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिटप्रमाणे ही चाचणी पार पडू शकते. काही सेना अधिकाऱ्यांनी याबद्दलची पुष्टी देखील केली आहे.
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दशक्रियेचे आमंत्रण, संत्री उत्पादक शेतकऱ्याने केली होती आत्महत्या
मात्र, अजून या टायपिंग चाचणीचे मानक हे ठरवण्यात नाही आले. याबद्दलचे अपडेट देखील लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. सतत भरती प्रक्रियेबद्दल बदल हे केले जात आहेत. लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल. आता हा टायपिंग चाचणीचा देखील यामध्ये समावेश होणार आहे.