नागपूर : पंजाबमध्ये कर्तव्यावर असताना अचानक फरार झालेल्या मेजरला सैन्य अधिकाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेतले होते. सैन्याच्या ताब्यातून त्या मेजरने दोन दिवसातच पुन्हा पळ काढला.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी कामठी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मेजर राजीव धालसिंह बोपचे (३५, सिवनी, मध्यप्रदेश) असे संबंधित फरारी अधिकाऱ्याचे नाव आहे.

बोपचेची पंजाब येथील भटिंडा येथे पोस्टिंग होती व फेब्रुवारी २०२० मध्ये सैन्याकडून बोपचेला फरार घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता व त्याच्याविरोधात ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली होती. २९ जुलैला इमिग्रेशन विभागाने बोपचेला विमानतळावरून ताब्यात घेतले व त्यानंतर त्याला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाला सोपविले. पोलिसांनी याची सूचना गार्ड्स रेजिमेंटल सेंटरला दिली होती. तेथील अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी सायंकाळी त्याचा ताबा घेतला व त्याला सेंटरमधील ऑफिसर्स मेसमध्ये ठेवण्यात आले होते. ३० जुलैला त्याला भेटण्यासाठी त्याची आई व भाऊ संदेश हे आले होते.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’

हेही वाचा >>>प्रेयसीला तिचा पती मारत असल्याचे खटकले म्हणून प्रियकराने…

ते सायंकाळी परतल्यानंतर बोपचे त्याच्या खोलीतच होता व बाहेर सैनिक पहारा होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो बाथरूममध्ये गेला व तेथील ग्रिल तोडून त्याने पळ काढला. सैन्याकडून फरार झालेला मेजर ताब्यात घेतल्यानंतर परत फरार झाल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जुनी कामठी पोलीस ठाण्यात बोपचेविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

Story img Loader