अमरावती : पाच लाख रुपये दे; अन्यथा तुझ्या मुलीचे माझ्यासोबतची अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारीत करेल, अशी धमकी देत एका व्यावसायिकाला खंडणी मागण्यात आली. तसेच ती छायाचित्रे व्यावसायिकाच्या पुतण्याच्या समाज माध्यमांवरील आयडीवर पाठविण्यात आले. ही घटना कोतवाली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अध्ययन चव्हाण (रा. कानपूर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या व्यावसायिकाच्या मुलीची व आरोपीची समाज माध्यमावर ओळख झाली होती. मात्र, त्यानंतर अध्ययन तिला त्रास देऊ लागला. त्यामुळे तिच्या व्यावसायिक वडिलांनी १५ डिसेंबर २०२३ रोजी अध्ययनशी मोबाइलद्वारे संपर्क साधला. त्यावर तुमच्या महिला नातेवाईकाची व माझी खासगी छायाचित्रे माझ्याकडे आहेत. ती छायाचित्रे प्रसारीत होऊ द्यायचे नसतील, तर दहा दिवसांत ५ लाख रुपये देण्याची मागणी त्याने केली. न दिल्यास ती छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारीत करण्याची धमकी त्याने दिली. त्याला समजविण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने त्यांना शिवीगाळ केली.
हेही वाचा…चंद्रपूर : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने तिघांना चिरडले, अपघातानंतर चालक पसार
अध्ययन समजण्याच्या मानसिकतेत नसल्याने मला तुझ्या आईशी बोलायचे आहे, असे व्यावसायिकाने म्हटले. त्यावर अध्ययनने एका महिलेजवळ आई म्हणून मोबाइल दिला. तुमचा मुलगा अत्यंत चुकीचे वागत आहे, त्याला समजून सांगा, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर त्या महिलेनेदेखील ‘मेरा बेटा जैसे बोल रहा है, उतने पैसे लाकर दे दो, फिर मै उसको बोलती हू. नही तो वह फोटो व्हायरल कर देगा’, अशी धमकी त्या महिलेने दिली. मोबाइलवर बोलत असतानाच अध्ययनने व्यावसायिकाच्या पुतण्याच्या समाज माध्यमावरील आयडीवर त्यांच्या काही अश्लील छायाचित्रे पाठविली. पाच लाख रुपये न दिल्यास ती समाज माध्यमांवर प्रसारीत करेल, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर अध्ययनने व्यावसायिक व त्यांच्या मुलीला वारंवार फोन करून धमक्या दिल्या. अध्ययननचा त्रास वाढत चालल्याने व्यावसायिकाने अखेर कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.