नागपूर: हत्येप्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेच्या काळात तो पॅरोलवर बाहेर आला आणि नंतर तो कारागृहात परतलाच नाही. तब्बल १२ वर्षे तो फरार होता. मात्र अचानक त्याने आत्मसमर्पण केले. हे सर्व कशासाठी तर मुलीच्या शिक्षणासाठी.

संजय तेजने याला हत्येच्या प्रकरणात २००५ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगत असताना संजय दोन वेळा पॅरोलवर बाहेर आला होता. पहिल्यांदा तो जेव्हा तुरुंगातून बाहेर आला तेव्हा पत्नी गर्भवती होती. तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यानंतर संजयने शिक्षा माफ करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला. पण तो फेटाळण्यात आला. त्यानंतर संजयने पॅरोलसाठी अर्ज केला व तो मंजूर झाला. पण यावेळी तो परत कारागृहात गेला नाही. तो फरार होता.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Donald Trumps legal cases
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गुन्हेगारी खटल्यांचे काय होणार? त्यांची निर्दोष मुक्तता होणार?

हेही वाचा – बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर; दिव्यांग मंत्रालय विभाग केवळ नावापुरतेच!

हेही वाचा – सत्ताधाऱ्यांकडून गांधींच्या मारेकऱ्यांना ‘थोर नायक’ ठरविण्याचा प्रयत्न – वडेट्टीवार

या काळात संजयने मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. संजय यांच्या मुली श्रद्धा आणि श्रुतीने १२ वीत अनुक्रमे ८६ आणि ८३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर १२ वर्षांपासून फरार असलेल्या संजयने आत्मसमर्पण केले. या १२ वर्षांत संजय फरार होता पण त्याचे आयुष्य कारागृहापेक्षा वेगळे नव्हते. पकडले जाऊ नये म्हणून दडून बसला होता. मुलींचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी ही त्याची धडपड होती.