गोंदिया : देशातील सर्व कामगार कर्मचारी श्रमीक संगठनेच्या वतिने आज ९ ऑगस्टला कामगार, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर विरोधी भाजपाच्या मोदी सरकारला चले जाव या घोषणेसह विभिन्न मांगण्याना घेवून दुपारी गोंदियातील नेहरू चौकपासून ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कॉ. हौसलाल रहांगडाले, राज्य सचिव कॉ. मिलिंद गणवीर, जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ. शालु कुथे यांच्या नेतृत्वात शहरात प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
या मोर्च्यातील मुख्य मागण्यात ४ कामगार विरोधी कायदे परत घ्या, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थाबंवा, वाढती महागाईवर आळा घाला, सरकारी क्षेत्रात नोकरी भर्ती करून बेरोजगारांना रोजगार द्या, कंत्राटीकरण थांबवा, अंगणवाडी कर्मचारी, आशा गटप्रवर्तक, कंत्राटी नर्सेस, शालेय पोषण, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा, सर्वाना पेन्शन लागू करा, जिल्हा परिषदेत कंत्राटी नर्सेस यांना नियमित करा, अंगणवाडी सेविकांना सुपरवाईजर पदावर बढती द्या, गटप्रवर्तकांना सुपरवाईजर पद मान्य करा, ग्रामपंचायत कर्मचारी १० टक्के पद भरा, ग्रॅज्युटी, पी.एफ. कामगार कायदे सर्वाना लागू करा, मनरेगा कामाचे २०० दिवस व ६०० रुपये मजुरी करा, वनजमिनीचे पट्टे द्या, शेतकऱ्यांना स्वामीनाथन कमिशन लागू करा, गरीबांना रेशन, आवास, आरोग्य सेवा, शिक्षण चांगल्या दर्जाचा द्या आदी मांगण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी गोंदिया मार्फत शासनाला देण्यात आले.
हेही वाचा – विदर्भवादी आक्रमक! आंदोलकांना पोलिसांनी रोखल्याने तणाव, ‘या’ आहेत मागण्या…
हेही वाचा – बाईक रॅली काढून कर्मचाऱ्यांनी दिले मुख्यमंत्र्यांना आश्वासनांचे स्मरण
मोर्च्यात कॉ. करुणा गणविर, कॉ. शकुनतला फटिंग, कॉ. वर्षा पंचभाई, कॉ. शत्रुघन लांजेवार, कॉ. विजय चौधरी, कॉ. शेखर कनोजिया, कॉ. प्रल्हाद उके सह सेकडो महिला, पुरुष कर्मचारी सहभागी होते.