चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा सत्ताधारी सरकारने मराठा व धनगर समाजाला एक न्याय आणि ओबीसींच्या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या तातडीच्या बैठकीत रविवार २४ सप्टेंबर रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर तथा आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर तिरडी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाची तातडीची बैठक मातोश्री सभागृहात पार पडली.

ओबीसी समाजाचे ज्येष्ठ बबनराव फंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, तेली समाजाचे सुर्यकांत खनके, ॲड.पुरूषोत्तम सातपुते, नंदू नागरकर, दिनेश चोखारे, अनिल धानोरकर, मिनाक्षी देरकर, पप्पू देशमुख, मनिषा बोबडे, हिराचंद बोरकुटे, ॲड. दत्ता हजारे, निलेश खरबडे, उमाकांत धांडे, तामगडे, राजू बनकर, श्याम राजुरकर यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव सहभागी झाले होते.

scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Expedite work of houses under PMAY in Maha says cm fadnavis
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप

हेही वाचा >>>राज्यात मैत्री अन् अकोला जिल्ह्यात कुरघोडी

यावेळी शनिवार २३ सप्टेंबर रोजी जनता महाविद्यालय चौकात रस्ता रोको आंदोलन, २४ सप्टेंबर रोजी पालकमंत्री मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष अहीर, स्थानिक आमदार जोरगेवार यांच्या घरावर तिरडी मोर्चा आंदोलन करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतनिधींनी/आमदारांनी मंडपात येऊन किमान एक दिवस तरी उपोषणास बसावे असाही निर्णय घेण्यात आला. तर ३० सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. त्यानंतर प्रत्येक तालुकास्तरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २९ सप्टेंबर रोजी मुंबईत ओबीसींची बैठक लावली आहे. या बैठकीला शासनाने ठरवून दिलेल्या प्रतिनिधीं ऐवजी आम्ही प्रतिनिधींची नावे कळवू त्यांना बैठकीला बोलवावे, शासनाच्या पत्रात विशिष्ट पक्षाचा बोलबाला आहे तसेच ज्या नागपुरात साखळी उपोषण सुरू आहे, तेथील प्रतिनिधींचा भरणा आहे त्याउलट चंद्रपुरात १२ दिवसांपासून उपोषण सुरू असतात तेथील लोकांना चर्चेला बोलावून स्थानिकांकडे दुर्लक्षित करित असल्याचा आरोपही केला.

हेही वाचा >>>अबब! ७ ग्रॅमला ३२ हजार रुपये, सोन्याएवढ्या महाग ‘मॅफेड्रॉन’ मादक पदार्थाची तस्करी

ओबीसींच्या तातडीच्या बैठकीकडे भाजपात पदाधिकारी असलेल्या ओबीसी नेत्यांनी अक्षरश: पाठ फिरविल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. एकीकडे भाजपाचे नेते, पदाधिकारी मंडपात येतात, मात्र ओबीसींच्या बैठकांकडे पाठ फिरवितात, या अशा पाठ फिरविणाऱ्या ओबीसी नेत्यांनाही आगामी निवडणुकीत जागा दाखवून देवू असा इशाराही देण्यात आला.

Story img Loader