वाशिम : लग्नावर होणारा अवाजवी खर्च टाळून मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे गवळी समाजाच्या वतीने रविवारी, १८ फेब्रुवारीला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये एकाच मंडपात अवघ्या ३० ते ३५ मिनिटात २६ जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला. २०१५ पासून शिरपूर येथे गवळी समाजामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून आत्तापर्यंत १५० हून अधिक जोडप्यांचे विवाह सोहळे घेतले. शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या गवळी समाजाचा हा आदर्श कौतुकास्पद आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे गवळी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये विवाह सोहळे अतिशय खर्चिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे समाजातील कष्टकरी व सामान्य कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे विवाहासाठी होणारा मोठा खर्च व समाज बांधवांच्या वेळेची बचत होते. या हेतूने गवळी समाजाने २०१५ पासून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. २०२० – २१ या काळात कोरोनामुळे सामूहिक विवाह सोहळे घेता आले नाहीत. मात्र, त्यापूर्वी व त्यानंतर सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले. आतापर्यंत १५० हून अधिक जोडपी सामूहिक विवाह सोहळ्या अंतर्गत विवाहबद्ध झाले आहे. यावर्षीही रविवार १८ फेब्रुवारी रोजी गवळीपुरा भागामध्ये गवळी समाज विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यामध्ये शिरपूर, येथील जोडप्यासह अकोला, मेहकर, कारंजासह राज्याच्या विविध ठिकाणची २६ जोडपी हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत ३० ते ३५ मिनिटांत विवाहबद्ध झाली. या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी एकच भला मोठा मंडप उभारण्यात आला होता. या सोहळ्यासाठी शिरपूर येथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात गवळी समाज बांधव उपस्थित झाले होते. महागाईच्या व धकाधकीच्या युगामध्ये इतरांचा तुलनेने शिक्षणाचे प्रमाण कमी असलेल्या गवळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळ्याचा आदर्श इतरही समाजाकरिता प्रेरणादायी आहे.

हेही वाचा – हजयात्रेकरूंना त्यांचे पैसे परत मिळणार! ‘हे’ आहेत आदेश…

हेही वाचा – समाज माध्यमावर पोस्ट केली म्हणून परीक्षेत सहभागी होऊ दिले नाही, उच्च न्यायालय म्हणाले…

अवाजवी खर्च, वेळेची बचत

शिरपूर येथे गवळी समाजाने आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात विविध ठिकाणची २६ जोडपी एकाच मंडपात विवाहबद्ध झाली. त्यामुळे किमान २५ वेळा २५ ठिकाणी समाज बांधवांचा जाण्या येण्याचा खर्च व वेळेची बचत झाली. तर वधू पित्यांना मंडप, भोजनावळीसाठी येणारा खर्च एकत्रित केल्याने त्यांची मोठी आर्थिक बचत झाली आहे. शिरपूर येथील गवळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा गवळी समाज बांधवांसाठी हितकारक ठरत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A marriage ceremony was organized on behalf of the gawli community at shirpur jain in malegaon taluka pbk 85 ssb