जिल्ह्यातील औद्योगिक व व्यवसाय नगरी अशी ओळख असलेल्या खामगावातील आठवडी बाजारात लागलेल्या भीषण आगीत ८ दुकाने भस्मसात झाली. यात लाखोंची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गुरुवारी( दि.२७) रात्री १ च्या सुमारास ही आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. माहिती मिळताच खामगाव पालिकेसह बुलढाणा, शेगाव, मलकापूर, अकोला येथील अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. आज शनिवारी पहाटे शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली. या आगीत इलेक्ट्रॉनिक, किराणा, उपहारगृह, पान टपरी व भाजीपाल्याची मिळून ८ दुकाने राख झाली. शॉर्ट-सर्किटमुळे आग लागल्याची चर्चा आहे.