नागपूर: एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने नैराश्यात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना लक्ष्मीनगरात उघडकीस आली. रिद्धी ओमप्रकाश पालीवाल (२०, सोनार मोहल्ला, पारशिवनी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
पारशिवनीचे ओमप्रकाश पालीवाल यांची मुलगी रिद्धी ही अभ्यासात हुशार होती. बारावीत गुणवत्ता यादीत ती झळकली होती. ती गोंदिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ती नैराश्यात गेल्यामुळे उपचार घेण्यासाठी रिद्धी मंगळवारी सकाळी ती पारशिवनीवरून नागपुरात राहणारे मामाकडे आली होती. तिने मन रमत नव्हते. तिने एक वही घेतली. ‘काश मैंने आपकी बात मान ली होती. काश मैंने ध्यान न भटकाते हुये पढाई पर ध्यान दिया होता. तो मुझे कदम उठाना न पडता’ असे वाक्य लिहून आईवडिलांची माफी मागितली आहे.

हेही वाचा… तांदळावर अतिरिक्त कर; सुमारे ५० हजार मजूर बेरोजगार

दुपारी रिद्धीने पाण्याच्या टाकीच्या पाईपला ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळात मामाला ती गळफास घेतवलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच बजाजनगर पोलिसांना माहिती दिली. तिच्या आईवडिलांनाही बोलावून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A mbbs student got depressed and committed suicide in laxminagar nagpur adk 83 dvr