वर्धा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत निवडून आलेले प्राचार्य डॉ. राजेश भोयर यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सिनेट सदस्य राहण्याचा विक्रम स्थापित केला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत डॉ. भोयर यांनी अभिजित गुप्ता यांचा पराभव केला. दोघांनाही समान मते पडल्यावर ईश्वर चिठ्ठीने निकाल काढण्याची भूमिका समोर आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: नागपूर: विद्यापीठाच्या निवडणुकीत शिक्षक गटात महाआघाडीला धक्का; खुल्या वर्गातील सहा जणांचा विजय

मात्र, भोयर यांनी अशावेळी प्रथम पसंतीची मते मोजून निकाल देण्याचा नियम निदर्शनास आणून दिला. त्यात भोयर यांना विजयी घोषित करण्यात आले. गेल्या ३५ वर्षांपासून ते सदस्य म्हणून निवडून येत असून आता परत पाच वर्षे, अशी चाळीस वर्षे सदस्यपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावे नोंदवला गेला आहे. २०१० पासून व्यवस्थान प्रतिनिधी गटातून व त्यापूर्वी प्राचार्य गटातून ते सिनेटवर निवडून आले. महिला विकास संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. भोयर विद्यापीठ राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या संस्थेतर्फे जिल्ह्यात विविध महाविद्यालये संचालित केल्या जातात. नवीन महाविद्यालयांचे अनुदान, वाढीव वर्गतुकड्या, रिक्त पदे व अन्य समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A member of the senate for the longest time record dr rajesh bhoyar at nagpur university wardha tmb 01