नागपूर: शहरातील एका अल्पवयीन मुलीने आधी बलात्काराची तक्रार केली. पण, मात्र न्यायालयात प्रकरण गेल्यावर तिने याला नकार दिला. मुलीनेच आरोपांबाबत माघार घेतल्याने बलात्काराच्या आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. विशेष सत्र न्यायालयातील न्यायाधीश ए.सी.राऊत यांनी हा निर्णय दिला आहे. आरोपी अभिषेक विष्णुप्रसाद कुरील (वय २१) हा भोपाळ येथील रहिवासी आहे.

तक्रारकर्ती मुलगी २६ एप्रिल २०२२ रोजी लग्नाच्या कॅटरिंगच्या कामाकरिता भोपाळलाल गेली होती. यावेळी तिची आरोपीशी ओळख झाली. काही दिवसांमध्येच त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले. आरोपीच्या आग्रहाखातर तक्रारकर्ती मुलगी २० मे पर्यंत भोपाळमध्येच राहिली. यावेळी आरोपीच्या आईने मुलीचा देहव्यापारासाठी वापर केला, अशी तक्रारही मुलीने केली होती.

हेही वाचा… पुण्‍यातून फरार गुन्‍हेगारांना अमरावतीत अटक

आरोपीनेही मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने तिची अश्लील छायाचित्रे काढून इंटरनेटवर व्हायरल केली. १० सप्टेंबर २०२२ रोजी मुलीने जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. न्यायालयात प्रकरण गेल्यावर मात्र मुलीने सर्व आरोपांवर नकार दिला. मुलीने आरोप नाकारल्याने आरोपी मुलाला सोडण्यात आले. आरोपीच्यावतीने ॲड. सुनीता कुलकर्णी आणि ॲड. संतोष चांडे यांनी बाजू मांडली.

Story img Loader