लोकसत्ता टीम

बुलढाणा: अल्पवयीन मुलीला पुणे येथे पळवून नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधमास बुलढाणा न्यायालयाने वीस वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

मागील २ एप्रिल २०१८ रोजी सकाळी बुलढाणा तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली. मात्र ती परत न आल्याने प्रदीप उर्फ गोलू फकिरा तारगे याने तिला पळवून नेल्याची तक्रार पित्याने बुलढाणा ग्रामीण पोलिसांकडे केली. प्रारंभी कलम ३६३, ३६६ नुसार गुन्हा दाखल झाल्यावर तपासात दीड महिन्यानंतर ती मुलगी आरोपी सोबत पुणे येथे राहत असल्याचे आढळून आले. तिने आपल्या जवाबात आरोपीने अत्याचार केल्याचे सांगितले. त्यावरून आरोपी विरुद्ध भादवी कलम ३७६( २)(एन) , बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ चे कलम ४ व ७ नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला.

आणखी वाचा- लग्न चार दिवसांवर अन् नियोजित वराने सासुरवाडीतच उचलले टोकाचे पाऊल

बुलढाणा येथील प्रमुख जिल्हा न्यायालयात आरोप पत्र दाखल झाल्यावर खटला सुनावणीसाठी जिल्हा न्यायाधिश-१ आर. एन. मेहरे यांच्या समक्ष आला. यावेळी १० साक्षीदारांच्या साक्षी, पुरावे आणि सरकारी वकील सोनाली सावजी- देशपांडे यांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायधीशानी आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. पैरवी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश लोखंडे यांनी सहकार्य केले.

Story img Loader