यवतमाळ : पैसे देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना पुसद येथील आदर्शनगरात घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून वसंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शोहेब सलीम निर्बान (१९, रा. आदर्शनग, पुसद) असे गुन्हा नोंद झालेल्या युवकाचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी ही इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. तिची वर्षभरापूर्वी शोहेब याच्याशी ओळख झाली होती. त्यामुळे ती युवकाच्या घरीदेखील जात होती. त्याच्या आईने एक दिवस पैसे मागितले असता, मुलीने पाचशे रुपये दिले होते. पाच महिन्यांपूर्वी युवकाला पैशाचे काम असल्याने त्याला अंगठी दिली होती. त्यानंतर त्याला अंगठी मागण्याचा प्रयत्न केल्यास टाळाटाळ करीत होता. माझ्याकडे फोटो असून, ते इंस्टाग्रामवर टाकण्याची धमकी देत होता. दोन दिवसांपूर्वी शोहेब हा मुलीच्या शाळेजवळ आला. माझ्याकडे अंगठी नाही. मात्र, पैसे देतो असे म्हणून त्याने घरी बोलावले. मंगळवारी दुपारी चार ते पाच वाजता दरम्यान मुलगी घरी गेली असता, त्याने पैसे शोधण्याचा बहाणा केला. पैसे आई घेवून गेली असेल, असे म्हणत विनयभंग केला.

हेही वाचा – नागपूरची नागनदी प्रदूषितच, निवडणुकांच्या तोंडावर आणखी एक समिती

हेही वाचा – परदेशी शिष्यवृत्तीसाठी मराठा समाजाकडून केवळ ८२ अर्ज; ओबीसींची संख्या अधिक

मुलगी जोरात ओरडल्याने काही अनोळखी मुले तिथे आली. त्यामुळे सुटका करून पीडित आपल्या घरी परतली. ही घटना तिने पालकांना सांगितले. याप्रकरणी पीडितेने वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शोहेब निर्बान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl was molested by calling her home on the pretext of paying money in pusad nrp 78 ssb
Show comments