नागपूर: बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून नेऊन घरात कोंडून बलात्कार करण्यात आला. कशीबशी सुटका केल्यानंतर मुलीने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली. सागर जनार्धन राऊत (२२) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी बारावीत शिकते. तिचे आईवडिल शेतमजूर आहेत. तिच्यावर आरोपी सागर राऊत याची वाईट नजर होती. तो नेहमी तिच्या पाठलाग करीत तिला जातीवाचक शिवीगाळ करीत होता. त्याची एकदा तक्रार आईवडिलाकडे केली होती. त्याची समजूत घालण्यात आली होती.
हेही वाचा… “शरद पवार डबल गेम खेळतात”, बावनकुळेंची टीका
मात्र, तेव्हापासून तो मुलीला जास्त त्रास द्यायला लागला. तिच्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून तिच्यावर शेरेबाजी करायला लागला. अनेकदा त्याने तिला रस्त्यावर अडवून प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. मात्र, तिने वारंवार त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सागरने तिला बलात्कार करण्याची धमकी दिली होती. २६ जूनला दुपारी बारा वाजता वस्तीतील लोक शेतात गेल्यानंतर मुलगी आजीला बोलवायला शेजारी जात होती.
हेही वाचा… नागपूर : सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; मेडिकल कर्मचारी संस्थेची…
त्यावेळी सागरने तिला रस्त्यावरून उचलून घरी नेले. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला घरात कोंडून ठेवले. मात्र, तिने खिडकीतून उडी घेऊन तेथून पळ काढला. सायंकाळी आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर राऊत याला अटक केली.