नागपूर : फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर युवकाने बाराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रवीण लहारे (नागपूर) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती सावनेरमध्ये महाविद्यालयात शिकते. तिची प्रवीणसोबत सप्टेंबर २०२२ मध्ये फेसबुकवरून मैत्री झाली. दोघांचे संबंध वाढले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रवीण तिला भेटायला केळवदला जायला लागला. तर कधी दोघांचीही नागपुरात भेट होत होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. २६ फेब्रुवारीला दोघांनी भेटण्याचे ठरवले. नियोजनानुसार प्रवीणने तिला नागपुरात बोलावले. सीताबर्डी परिसरात दोघांची भेट झाली. महाराज बागमध्ये गप्पा करण्याचे ठरले. दोघेही काही वेळ बसल्यानंतर दुपारी दोन वाजता प्रवीणने तिला जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये जात असल्याचे सांगितले. दोघेही थेट एका लॉजमध्ये गेले. प्रवीणने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यानंतर त्याने तिला प्रेमसंबंध संपवण्याचा धाक दाखवला. त्यामुळे तिने शारीरिक संबंधास होकार दिला.

हेही वाचा – साहित्य महामंडळाची साद ‘गावाकडे चला’!उस्मानाबाद, उदगीर, वध्र्यानंतर अमळनेरला पसंती

प्रवीणने मुलीचा नकार असतानाही बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणालाही काहीही न सांगण्याची प्रवीणने धमकी दिली. मुलीच्या वागण्यावरून आईला संशय आला. तिने विचारपूस करीत तिला धीर दिला. त्यानंतर तिने प्रवीणने बलात्कार केल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl was taken to a lodge and raped in nagpur adk 83 ssb