चंद्रपूर : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसी धाक दाखवून विनयभंग करणाऱ्या पोलिस शिपाई व चार मित्रांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस शिपाई बावणे याला निलंबित केले आहे.पोलिस शिपाई सचिन बावणे, महेंद्रपालसिंग सनोतरा, विजयशंकर पिल्ले, संतोष कानके ही अटकेतील आरोपींचे नाव आहे. रविवारी पोलिस शिपाई सचिन बावणे व त्याचे चार मित्र पार्टी करायला मामला परिसरात गेले होते. पार्टी करून परत येताना त्यांना मामला रस्त्यावर दोन जोडपी दिसून आली. पोलीस शिपाई बावणे यांनी या जोडप्याना धमकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जबरदस्ती गाडीत बसण्यास सांगितले. गाडीत बसले नाही तर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिमी. दरम्यान यावरून दोन जोडपी व पोलीस शिपाई यांच्यात वाद देखील झाला. याच वेळी शिपाई बावणे याने मुलीला जबरदस्तीने गाडीत बसविले. यावेळी तिचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या मैत्रिणीने बघितला.पीडित मुलीच्या मैत्रिणीने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर शिपाई सचिन बावणे तथा चार मित्र विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास रामनगर पोलीस करत आहे. मुलीचा विनयभंग करणारा पोलिस शिपाई सचिन बावणे याला जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी तत्काळ निलंबित केले आहे.पोलिस दलाचे नाव बदनाम करणाऱ्यावर, तसेच गुन्हेगारांवर आम्ही कडक कारवाई करू, असे पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी म्हणाले.