गोंदिया : नक्षलवाद्यांसाठी स्फोटके घेऊन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात अटक केली. त्याच्याजवळून एक डेटोनेटर आणि एक जिलेटीनची कांडी जप्त करण्यात आली आहे.
किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी (३१, रा. खारकाडी, पो. हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली), असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. तो टीपागड दलमचा सक्रिय सदस्य असून, २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांवर मरकेगाव, हत्ती गोटा येथे केलेल्या हल्ल्यात आणि २०११ मध्ये खोब्रामेंढा गोळीबार, मुरुमगाव येथील हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे.