बुलढाणा : घरासमोर उभी असलेली वीस लाखांची कार तिघा अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली. परिसरात असलेल्या ‘सीसीटीव्ही’मध्ये कार जळणारे व क्षणार्धात पेटलेली चारचाकी टिपल्या गेली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – हिंगणा: कारखान्याला आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
स्थानिय मच्छी ले आउटमधील वाघ हॉस्पिटलसमोर काल रात्री २ वाजताच्या आसपास ही घटना घडली. वाघ हॉस्पिटलसमोर राहणाऱ्या सुनील डोंगरे नामक व्यक्तीची महागडी नवीन कार अज्ञात ३ व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळून टाकली. कारची किंमत १५ ते २० लाख रुपये सांगण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
First published on: 24-04-2023 at 16:33 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A new expensive car was set on fire in buldhana scm 61 ssb