वर्धा : सेंद्रिय धान्य, भाजीपाला व अन्य सेंद्रिय उत्पादनाचा सध्या चांगलाच बोलबाला आहे. शुद्ध व रसायन मुक्त म्हणून त्याची चढ्या भावाने विक्रीपण होते. अशा सेंद्रिय खाद्याचा विशेष वर्ग असल्याने ते वाटेल त्या किमतीत हा माल विकत घेतात. हे हेरून काही चोरट्यांनी चोरलेली तूर डाळ सेंद्रिय असल्याचे सांगत वर्षभरापासून बाजारात खपविली.

आम्ही अस्सल शेतकरी. रासायनिक खते न वापरता तुरीचे उत्पादन घेतो. घरीच डाळ तयार करतो. सेंद्रिय धान्य प्रसार म्हणून उधारीवरसुद्धा देतो, अशी बतावणी करीत हा गोरखधंदा सुरू होता. पण हिंगणघाट येथील अभय तांबोळी यांनी त्यांच्या डाळ मिलमधून तुरीची डाळ चोरीला जात असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली अन् बिंग फुटले. तपासात या दालमिलमध्ये काम करणारा शिवनंदी कानोजिया हाच चोरट्यांचा म्होरक्या निघाला. त्याने कबूल केल्यानंतर शेर अली, सुभाष गायकवाड, रवींद्र मोहूर्ले, प्रतीक दुर्गे, रा.सर्व हिंगणघाट या त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली. त्यांनी घरोघरी व दुकानदारांना विकलेली डाळ जप्त करण्यात आली आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
tur dal price , tur dal price sangli , tur dal,
तूरडाळ सामान्यांच्या आवाक्यात !
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Hapus season delayed , Hapus pune, pune, mango ,
पुणे : पावसामुळे हापूसचा हंगाम सुरू होण्यास विलंब, मार्केट यार्डात हंगामपूर्व हापूसची पहिली पेटी दाखल
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?

हेही वाचा – कौतुकास्पद! आधी श्रमदान, नंतर लग्न; मीनाक्षीने मेहंदी लावलेल्या हातांनी…

प्रती कट्टा सहा हजार रुपये याप्रमाणे हे चोरटे ही चोरीची डाळ सेंद्रिय म्हणून ग्राहकांच्या मस्तकी मारत होते. त्यांच्याकडून तीन वाहने, बारा लाख रुपयांची डाळ व अन्य असा एकूण पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनात वीरेंद्र मस्के, अरविंद येनुरकर, रवी पुरोहित, वैभव चरदे यांच्या चमूने ही कारवाई फत्ते केली.

Story img Loader