गोंदिया: जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव केला. ही बातमी आमच्यापर्यंत समाजमाध्यमातून पोहचल्यानंतर लगेच नानव्हा गावचे सरपंच सर्व पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात प्रेम विवाहाला विरोध करण्यासारख्या घटना वाढत आहेत. आम्ही “राईट टू लव्ह” या संघटनेतर्फे या ठरावाचा कडाडून निषेध करत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं आईवडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल तर त्या प्रेम विवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे. असा बेकायदेशीर आणि असंविधानिक ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला कोणताच अधिकार नाही. आपलं संविधान आपल्याला जोडीदार निवडण्याचा अधिकार देते.

हेही वाचा… बुलढाण्यात पावसाचे पुनरागमन; पाच मंडळात अतिवृष्टी

मग तो जोडीदार कोणत्याही जाती धर्मातला असला तरी त्यात सरकारच्याही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून योजना असताना सदरच्या ठरवामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे. नानव्हा ग्रामपंचायतीने केलेला ठराव बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही आमच्या “राईट टू लव्ह” या संघटनेमार्फत नानव्हा ग्रामपंचायतीस कायदेशीर नोटिस पाठवली असून सदर ठराव नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत रद्द करण्यास सांगितले आहे तसेच नोटीस नमूद कालावधी मध्ये ठराव रद्द न केल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व सभासदांवर व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईची करणार असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा… चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

आमचा प्रेमविवाहाला विरोध नाही पण असे करताना मात्र दोघांच्या घरच्यांची परवानगी आवश्यक करण्याचा ठराव घेण्यात आला असून त्यावर शासनाचा मार्गदर्शन मागितले आहे. राईट टू लव्ह संघटना पुणे चे रोशन मोरे यांनी कॉल करून नोटीस बजावली असल्याची माहिती दिली असल्याचे नानव्हा चे सरपंच गौरीशंकर बिसेन यांनी सांगितले.

प्रेमविवाह ला घरच्यांची परवानगी असे ठराव ग्रामसभेत बहुमताने घेतले आहे. यावर शासनाचे मार्गदर्शन मागितले आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेणार. राईट टू लव्ह संघटनेचा कॉल सरपंच यांना आला. पण अद्याप कागदोपत्री अशी कोणतीही नोटीस नानव्हा ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. – शिवाजी राठोड , ग्रामसेवक, ग्रामपंचायत नानव्हा.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A notice has been sent by right to love against the nanwha gram panchayat about registration of love marriage only if the family has permission sar 75 dvr