रेल्वेगाडीत चढताना तोल जाऊन खाली पडल्याने प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना तुमसर रोड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर घडली. रमेश श्रीवास (५२, रा. सुभाष वॉर्ड तुमसररोड) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वेखाली आले नाही.रमेश श्रीवास हे तुमसररोड स्थानकावरून भंडारारोड येथे जाण्याकरिता आले होते. दरम्यान, फलाट क्रमांक ३ वर टाटा पॅसेंजर रेल्वेगाडी आली. यावेळी रमेश हे रेल्वेगाडीत चढत असताना त्यांचा पाय घसरला व ते खाली पडले. सुदैवाने ते रेल्वे ट्रॅकखाली न आल्याने थोडक्यात बचावले.
हेही वाचा >>>चंद्रपूर : प्रदूषणात भर घालणारा लॉयड्स मेटल प्रकल्प बंद करा; नीरीचा अहवाल, कारवाई मात्र शून्य
मात्र त्यांच्या उजव्या हाताला व शरीराला गंभीर जखमा झाल्या. रेल्वे कर्मचाèयांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढले व स्थानिक रेल्वे रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचार करून तुमसर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. प्रवासादरम्यान रेल्वे गाडीत चढताना प्रवाशांनी घाई न करता सुरक्षित एकमेकांना सहकार्य करून प्रवास करावा, असे आवाहन तुमसररोड रेल्वे प्रबंधकांनी केले आहे.