नागपूर: ताजबागच्या ऊर्समध्ये सहभागी होण्यासाठी दीड महिन्यापूर्वी तेलंगणातील कुटुंब नागपुरात आले होते. त्या कुटुंबातील मानसिक आजार असलेला एक सदस्य हरवला. बरेच दिवस शोध घेतला परंतु तो आढळला नाही. त्यामुळे कुटुंबीय त्यांच्या गावी परतले. हरवलेल्या त्या व्यक्तीला कुणीतरी मेडिकलला दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याच्या तोंडून गावाचे नाव निघाले. त्यानंतर प्रशासनाच्या प्रयत्नाने तो घरी पोहचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेडिकल रुग्णालयात १५ ऑगस्टला एक निराधर रुग्ण उपचारासाठी दाखल झाला. रुग्णासोबत कुणीही नसल्याने समाजसेवा विभागाला सूचना दिली गेली. उपचारादरम्यान समाजसेवा अधीक्षक विक्रम लांजेवार यांनी रुग्णाचे समुपदेशन केले. त्याला फारसे बोलता येत नव्हते. उपचारादरम्यान एकदा त्याने तेलंगणातील काझीपेठचे नाव घेतले. समाजसेवा अधीक्षकांनी तेलंगणातील भाषेची जाण असलेल्याशी त्याचा संवाद घडवून आणला. त्यानंतर संबंधित शहरातील पोलिसांशी संवाद साधून रुग्णाच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला गेला.

हेही वाचा… “यशोमती ठाकूर भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या,” आमदार रवी राणा यांचा दावा, म्हणाले…

शोधाअंती त्याच्या बहिणीचा शोध लागला. भाऊ सापडल्याचे कळताच तिला अश्रू अनावर झाले. लगेच रुग्णाचे नातेवाईक मेडिकल रुग्णालयात पोहचले. १२ सप्टेंबरला कुटुंबीयांसोबत ते आपल्या घराकडे निघाले. याप्रसंगी सगळ्यांनी डॉक्टर, परिचारिकांसह येथील समाजसेवा अधीक्षक विभागातील अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A patient from telangana who went missing in nagpur returned home after one and a half months mnb 82 dvr
Show comments