नागपूर : अमरनाथ यात्रेला गेलेले अकोला जिल्ह्यातील सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह दरीत पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना लष्कराच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केले.

तोष्णेयार हे पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावर बसून दर्शन करून परत येत असताना बारारीमार्गावर खेचराचा तोल गेला आणि तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने १०० फूट दरीत कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. भारतीय लष्कराच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांना बारारीमार्गे सैन्य दलाच्या शिबिरात हलवले, अशी माहिती संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.

Story img Loader