नागपूर : यु-ट्यूब चँनलवरील ‘व्हिडीओला लाईक्स’ आणि ‘फॉलो’ केल्यास महिन्याला लाखो रुपये कमविता येतील, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका उच्चशिक्षित युवकाची १० लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यु नरसाळा येथील रहिवासी उल्हास लांडगे (३८) यांचा फेब्रीकेशनचा व्यवसाय आहे. त्यांचा व्यवसायही चांगला चालतो. एक दिवस त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज आला. आमच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्यांचे शोरूमचे व्हिडीओ आहेत. प्रत्येक लाईकला ५० रुपये मिळतील. तुम्हाला जेवढे लाईक्स मिळतील, तेवढी रक्कम तुमची वाढत जाईल. याशिवाय टारगेट पूर्ण केल्यावर लाखोंची रक्कम मिळेल, अशी बतावणी केली.

हेही वाचा – नागपूर : ‘मी डॉन आहे, पाच हजारांची खंडणी पाहिजे…’

सायबर गुन्हेगाराने त्यांना लिंक पाठविली. ती लिंक वेगवेगळ्या ग्रुपवर पाठविली. काही वेळातच त्यांना ३५० रुपये मिळाले. रक्कम मिळाल्यावर लांडगे यांचा विश्वास बसला. सायबर गुन्हेगाराने रक्कम पाठवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. दरम्यान ‘तुम्ही जेवढी रक्कम गुंतवणूक कराल तेवढा तुम्हाला नफा मिळत जाईल.’ फिर्यादीने आपल्या दोन्ही बँक खात्यांवरून २० हजार रुपये पाठविले. त्यावरही त्यांना नफा मिळाला. तीन लाख रुपये पाठविल्यास पाच लाख रुपये मिळतील, असे आमिष त्यांना दिला. त्यामुळे त्यांनी आपल्या खात्यावरून तीन लाख रुपये पाठविले. तीन लाखांवर पाच लाख रुपये मिळतील आणि पाच लाखांवर दहा लाख आणि दहा लाखांवर १८ लाख रुपये मिळतील, असे आमिष दिले.

हेही वाचा – चंद्रपूर : डॉ. अशोक जीवतोडे भाजपमध्ये प्रवेश करणार

लांडगे यांनी हळूहळू दहा लाखांची रक्कम आरोपीच्या बँक खात्यात जमा केली. मात्र, यावेळी त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा रक्कम मिळाली नाही. लांडगे यांनी विचारपूस केली असता ‘तुम्ही टारगेट पूर्ण केले नाही. त्यामुळे तुम्हाला लाभ देता येत नाही, तुम्ही टास्क पूर्ण करा तुम्हाला १८ लाख रुपये मिळतील,’ असे म्हटले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person lost 10 lakhs due to video likes in nagpur adk 83 ssb