बुलढाणा: देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण वानखेडे यांना एका इसमाने जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून धमक्याही दिल्या. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह शहरात खळबळ उडाली. प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगेश तिडके असे आरोपीचे नाव आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण वानखेडे यांच्या कक्षात जाऊन त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करीत धमक्या दिल्या. डॉक्टर वानखेडे यांनी तिडकेच्या विरोधात देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा – गोंदिया : बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा, राजकीय वर्तुळात…

हेही वाचा – आता अमरावतीतील रस्‍त्‍यांवरही धावणार इलेक्ट्रिक बस, ५० बसेस मंजूर

आरोपी फरार…

आरोपी तिडके विरोधात शासकीय कामात अडथळा व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी कारवाई करण्यात आली. भादवीच्या कलम ३५३, ३३२, १८६, २९४,५०६ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१) (आर )(एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (देऊळगाव राजा) अजयकुमार मालवीय करीत आहे. आरोपी तिडके फरार असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती मालवीय यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person said bad words to medical superintendent of deulgaon raja scm 61 ssb
Show comments