चंद्रपूर : बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कारवा जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना बुधवारी १३ मार्चला घडली. नामदेव आत्राम (६७) रा. बल्लारपूर असे मृतकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नामदेव आत्राम १३ मार्चला सकाळी कारवा जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेले होते. संध्याकाळ होवूनही घरी न परतल्याने घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देण्यात आली. पोलीस व वनविभागाने जंगल परिसरात शोधमोहीम राबविली असता, कारवा जंगलाच्या दोन किलोमीटर आत नामदेव आत्रामचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. वनविभागाने वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा – अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचा आज शरद पवार गटात प्रवेश होणार!

हेही वाचा – जि.प. शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ, शिक्षक आक्रमक, अधिकाऱ्यांची गाडी अडवत….

विशेष म्हणजे, बल्लारपूर शहरातील पंडित दीनदयाळ वॉर्डातील सोफिया इकबाल शेख या सहा वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केला. मुलीच्या किंचाळीने परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने मुलगी थोडक्यात बचावली. या हल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या दोन्ही घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A person who went to cut wood in the forest died in a tiger attack incidents in chandrapur district rsj 74 ssb