नागपूर : खासगी ‘ट्रॅव्हल्स’च्या बसचालकाने मद्यपान करून वाहन चालवणे, वाहनात भ्रमणध्वनीचा वापर, महिला प्रवाशांसोबत गैरवर्तनसह इतरही बऱ्याच घटना घडल्या आहेत. त्यावर नियंत्रणासाठी नागपुरात प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्स बसच्या दर्शनी भागात त्यातील चालकाचे छायाचित्र, भ्रमणध्वनी क्रमांकासह सर्व माहिती लावणे बंधनकारक राहणार आहे. राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प उपराजधानीत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमावर नुकताच एका खासगी ‘ट्रॅव्हल्स’चा बसचालक हा वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर चित्रपट बघत असल्याचे चलचित्र प्रसारित झाले होते. खासगी ‘ट्रॅव्हल्स बस’मधील हा सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी नागपुरात शहर पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्तरित्या एक अभिनव प्रकल्पावर काम करणे सुरू केले आहे. त्यानुसार संबंधित ‘ट्रॅव्हल्स’मध्ये ती चालवणाऱ्या बसचालकाचे छायाचित्र, भ्रमणध्वनी क्रमांक, पत्ता यासह सगळी माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक केले जाईल. त्यामुळे कुणाला बसचालक वा बसमधील सोयीसुविधेची तक्रार असल्यास ते नावानिशी संबंधित यंत्रणेकडे करू शकतील. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल असे सांगितले जात आहे. ‘ट्रॅव्हल्स’ संचालकांनीही त्याला अनुकूलता दर्शवली आहे.

हेही वाचा – नागपूर: फुटबॉल खेळताना चिमुकला खड्ड्यात पडला…,भवन्स शाळा प्रशासन मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप

हेही वाचा – गडचिरोली पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी खासगी ‘ट्रॅव्हल्स’च्या दर्शनी भागात त्यातील चालकाचे छायाचित्रासह सर्व माहिती लावण्याच्या सूचना १ नोव्हेंबरच्या बैठकीत केल्या. यामुळे बसचालकाकडून काही अनुचित घडल्यास त्याची तक्रार करता येणार आहे. – रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व नागपूर कार्यालय)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A photo of the driver in the facade of travels bus now in nagpur mnb 82 ssb