पत्नीच्या निधनामुळे नैराश्यात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. संतोष वानखडे (३८) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. संतोष वानखडे हे बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांची पत्नी सेंट्रल रेल्वेमध्ये कार्यरत होती. गेल्या वर्षी आजारामुळे पत्नीचे निधन झाले.

हेही वाचा: किमान वनमंत्र्यांना तरी वाघ दिसावा म्हणून नवा रस्ता!; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील वाघ, बिबट्या गेले कुठे?

तेव्हापासून संतोष नैराश्यात होते. त्यांना एक ११ वर्षीय मुलगा आहे. तो यवतमाळ येथे त्यांच्या आई-वडिलांकडे राहायचा. संतोष हे एकटेच रघुजीनगर पोलिस वासाहतीत राहायचे. मुलगा वारंवार आईच्या आठवणीत रडत असल्याने संतोष यांना दु:ख सहन होत नव्हते. नोकरीमुळे मुलाकडे दुर्लक्ष होत होते. यातूनच आज शनिवारी त्यांनी गळफास घेतला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Story img Loader