नागपूर : कन्हानमध्ये सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. सुमन करमचंद्र मौर्य (३६) असे आत्महत्या करणाऱ्या गर्भवती महिलेचे नाव आहे. परंतु, सुमनची आत्महत्या नसून काहीतरी घातपात घडवून आणल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करमचंद्र मौर्य हा मूळचा उत्तरप्रदेश-प्रयागराज येथील आहे. तो बोर्डा येथील टोल नाक्यावर पर्यवेक्षक म्हणून नोकरीला आहे. तो डुमरी शिवारातील बंद टोलनाक्याजवळ पत्नी सुमन आणि मुलीसह राहतो. सुमन या सहा महिन्यांच्या गर्भवती आहेत. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीत वाद सुरु होता तसेच ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. रविवारी सकाळी सात वाजता सुमन डुमरी शिवारामागील रेल्वे रुळावर गेली. तेथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, सुमन यांचा मृत्यू नसून काहीतरी घातपात झाल्याची चर्चा गावात सुरु होती. पोलीस निरीक्षक सार्थक नेेहते यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A pregnant woman committed suicide by jumping in front of the train in nagpur adk 83 amy