अमरावती : संभाव्य हॅकर्सपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर दोन ते तीन महिन्यांनी तुमचा इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलणे महत्त्वाचे असल्‍याचे तज्‍ज्ञांचे म्‍हणणे असते. पण येथील एका प्राध्‍यापकाला पासवर्ड बदलण्‍याचा प्रयत्‍न करण्‍याची मोठी किंमत मोजावी लागली. सायबर लुटारूंनी त्‍यांची सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नितीन अरूण वानखडे (वय ५०, रा. अप्‍पू कॉलनी, अमरावती) असे फसवणूक झालेल्‍या प्राध्‍यापकाचे नाव आहे. वानखडे यांना इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलायचा होता. त्‍यांनी इंटरनेटवर सर्च केले. त्‍यांनी एका वेबसाईटवर स्‍वत:चा युझर आयडी टाकून पासवर्ड बदलण्‍याची प्रक्रिया सुरू केली. पण, ती पूर्ण झाली नाही. त्‍यांना मोबाईलवर एक संदेश आला. त्‍यामध्‍ये त्‍यांना एक लिंक देण्‍यात आली. वानखडे यांनी या लिंकवर क्लिक करताच इंटरनेट बँकेचे पेज खुले झाले. त्‍यावर त्‍यांनी युझर आयडी, पासवर्ड आणि इतर तपशील टाकून प्रक्रिया पूर्ण केली. त्‍यांनतर त्‍याच वेबपेजवर ओटीपी येण्‍यास सुरूवात झाली. प्रक्रियेदरम्‍यान, वानखडे यांनी ओटीपी त्‍या वेबपेजवर टाकले असता अज्ञात सायबर लुटारूने त्‍यांच्‍या बँक खात्‍यातून टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने तीन वेळा एकूण ३ लाख २५ हजार रुपये वळते केले. आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच वानखडे यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचा – पावसाळ्यात “या” रानभाज्या खायलाच हव्यात; आरोग्यासाठी आहेत लाभदायक

हेही वाचा – ‘सायकलिंग म्हणजे ध्यानसाधनाच’, म्हणतात सायकलवर देशभ्रमंती करणारे आयआयटीचे तज्ञ.

कोणताही आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी सुरक्षित आणि वेरिफाईड अ‍ॅप्स किंवा वेबसाइट वापरण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. कोणतेही अनधिकृत अ‍ॅप किंवा वेबसाईट वापरल्याने ऑनलाइन बँकिंग फसवणूक होऊ शकते, असे सांगण्‍यात आले आहे.