नागपूर: सराफा दुकानातील चोरी केलेले एक किलो ३०० ग्रॅम सोने – चांदीचे दागिने तहसिल पोलिसांनी जप्त केले. जप्त मुद्देमालाची किंमत ८६ लाख १८ हजार रुपये आहे. न्यायालयाच्या आदेशाने सर्व महिलांची कारागृहात रवानगी करण्यात आली. अशी माहिती पोलिस उपायुक्त गोरख भामरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

अस्मिता उर्फ स्वाती लुटे (३९) रा. वर्धमाननगर, प्रिया राउत (३०) रा. पवनगाव रोड, पुजा भानारकर (२०) रा. पाचपावली, कल्याणी खळतकर (३३) रा. नंदनवन, भाग्यश्री इंदनकर (३०) आणि मनीषा मोहुर्ले (३८) अशी अटकेतील महिलांची नावे आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

रेशिमबाग येथील रहिवासी फिर्यादी शंतनू चिमूरकर यांचे तहसिल पोलिस ठाण्याअंतर्गत ईतवारी सराफा मार्केट येथे चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. दुकानात स्वाती, प्रिया, पुजा, भाग्यश्री, कल्याणी आणि मनीषा या सहाही महिला मागील काही वर्षांपासून काम करीत होत्या. चिमुरकर यांचा त्यांच्यावर विश्वास होता. मात्र आरोपी महिलांनी विश्वासाचा गैरफायदा घेत २०१९ ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान दुकानातील एक किलो ३०० ग्रॅम सोन्या-चांदीचे दागीने चोरले.

हेही वाचा… लालपरीचीही चाके थांबणार! ट्रक चालकांच्या संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता

चिमुरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहाही महिला कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयाच्या आदेशाने तीन दिवस पोलीस कोठडी मिळविली. पोलिसांच्या सखोल चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणातील मास्टर माईंड प्रिया आणि अस्मिता आहे. त्यांनीच चोरीची सुरूवात केली. संपूर्ण दागिने घरीच दडवून ठेवले.

पोलिसांनी घराची झडती घेतली असता अस्मिताकडून – ५७३ ग्रॅम सोने तर ४५१ ग्रॅम चांदी, प्रिया- ३६७ ग्रॅम सोने तर १९३५ ग्रॅम चांदी, कल्याणी- ४६ ग्रॅम सोने तर ३२४ ग्रॅम चांदी, पुजा- ११९ ग्रॅम सोने तर १३७३ ग्रॅम चांदी, भाग्यश्री- ७८ ग्रॅम सोने तर ३३० ग्रॅम चांदी आणि मनीषाकडून १६४ ग्रॅम सोने तर १३४० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाने सर्वाची कारागृहात रवानगी करण्यात आली. पत्रकार परिषदेला वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील, पोलिस निरीक्षक संदीप बुवा उपस्थित होते.

असा झाला भांडाफोड

ऑगस्ट २०२३ मध्ये एका कर्मचार्‍याने दुकानातून अंगठी चोरली होती. चोरी प्रकरणाची माहिती मिळताच चिमूरकर यांनी चौकशी केली. त्याने गुन्हा मान्य करून अंगठी परत केली. या प्रकरणी चिमुरकर यांनी तहसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मी एकटाच चोर नाही, दुकानात काम करणार्‍या महिलांनीही दागिने चोरले, अशी माहिती त्याने पोलिसांनी दिली. पोलिसांनी फिर्यादीला सांगितल्यावर त्यांनी कर्मचार्‍यांची चौकशी केली. महिला कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणा दाखवत एक दोन दागिने परत केले. फिर्यादीने लेखाजोखा तपासल्यावर जवळपास सव्वा किलो सोन्या चांदीचे दागिने चोरल्याचे समोर आले.

Story img Loader