अकोला : न्यायप्रविष्ट प्रकरणातील शेतीवर बळजबरी ताबा घेण्याला विरोध करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार व त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार १७ मे रोजी जिल्ह्यातील मनब्दा गावात घडला होता.

या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले. त्यानंतर मंगळवारी त्या सावकाराकडे सहकार विभागाने छापे टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
vishal gawali who assaulted girl in Chakki Naka area of ​​Kalyan handed over to Kolsewadi police
कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी डोंबिवलीतील पोलीस कोठडीत
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

शेतकरी गतमने व भांबेरी येथील सावकार मनोहर शेळके यांच्यातील शेतीच्या वादाचे प्रकरण अकोट न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. परंतु, शेळके यांनी दमदाटी करत शेतीबर ताबा घेण्याचा प्रयत्न १७ मे रोजी केला. सावकाराला शेतीचा ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी युवकाला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला. गतमने कुटुंबीयांवर सावकार शेळके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हल्ला चढवला. यात संदीप गतमने याला ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यांचे वडील हरिभाऊ गतमने यांच्यावरही धारदार शस्त्राने हल्ल्या केल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी तक्रारीवरून सावकार आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>चंद्रपूर : प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले, हत्या की आत्महत्या? संशय कायम

या गंभीर प्रकरणावरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दरम्यान, मनब्दा प्रकरणातील सावकाराकडे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अंतर्गत मंंगळवारी छापा टाकण्यात आला. एका पथकाद्वारे शोध मोहीम राबविण्यात आली. या छाप्यामध्ये आक्षेपार्ह नऊ खरेदीखत, दोन धनादेश, १७ बँक पासबुक, एक कोरा मुद्रांक, दोन धनादेश पुस्तक, दोन इसारचिठ्ठी व इतर पाच कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. छाप्यातील जप्त दस्तऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

तीन वर्षांनी अवैध सावकारावर गुन्हा दाखल

अवैध सावकारी प्रकरणात दिलीप अढागळे यांच्या तक्रारीवरून १३ ऑक्टोबर २०२१ रोजी शेख मुश्ताक शेख लतिफ यांच्याकडे छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणीमध्ये दाखल करण्यात आलेले जबाब, अर्जदार व गैरअर्जदार यांचे पुरावे, युक्तिवाद, छाप्यात जप्त करण्यात आक्षेपार्ह कागदपत्रांच्या आधारे शेख मुश्ताक शेख लतिफ हे विना परवाना सावकारी व्यवसाय करीत असल्याचे दिसून आले. तालुका उपनिबंधक ज्योती मलिये यांनी पारित केलेल्या अहवालानुसार मुख्य लिपीक गणेश भारस्कर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अवैध सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader