भंडारा : काळा अन् राखडी रंग पांढरे चट्टे असलेला दुर्मिळ प्रजातीचा मांजऱ्या साप तुमसर शहरातील पद्माकर रहांगडाले यांच्या घरी आढळून आला. याची माहिती मिळताच सर्पमित्र दुर्गेश मालाधरे यांनी सापाला मोठ्या शिताफीनं पकडले.

मांजऱ्या प्रजातीचा हा साप तुमसर शहरात पहिल्यांदाच आढळून आला. सर्पमित्राने या दुर्मिळ मांजऱ्या सापाला सुरक्षितरित्या वनविभागाच्या स्वाधीन केले. यानंतर या दुर्मिळ सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या दुर्मिळ मांजऱ्या प्रजातीच्या सापाला इंग्रजीत ‘Forsten’s Cat Snake’ असे म्हणतात. हा दुर्मिळ मांजऱ्या साप निमविषारी असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

Story img Loader