चॉकलेट आणायला घराबाहेर पडलेल्या २६ वर्षीय मतिमंद तरुणीचे ऑटोने अपहरण करुन रात्रभर बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी तरुणी घरी पोहचल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. मुकेश सुधाकर हेजीब (४०, रा. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- विदेशी पाहुण्यांना उपराजधानीतील संपन्नता दाखवणार; दारिद्र्य लपवणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय तरुणी आई व भावासह अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती अल्पबुद्धी असून तिचा सांभाळ आई करते. तिच्या घरासमोर आरोपी मुकेशचे नातेवाईक राहतात. अविवाहित असलेला मुकेश हा ऑटोचालक असून तो नेहमी नातेवाईकांकडे येत होता. त्यामुळे तरुणी व तिच्या आईशी त्याची ओळख होती. शनिवारी रात्री ९ वाजता तरुणी चॉकलेट आणण्यासाठी दुकानात गेली होती. रस्त्यात तिला आरोपी मुकेश भेटला. मुकेशने ऑटोत बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याने कुठेतरी अज्ञात ठिकाणी नेले. तेथे रात्रभर तरुणीवर लैंगिक अत्याचार केला.

हेही वाचा- सावधान! उपराजधानीत चिकनगुनियाचा शिरकाव; नववर्षातील पहिला रुग्ण आढळला

दुसऱ्या दिवशी त्याने तरुणीला वस्तीत आणून सोडून दिले आणि पळून गेला. ती तरुणी वस्तीत भटकत होती. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या आईने अजनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याच तक्रार दिली. पोलिसांनी रात्रभर तरुणीची शोधाशोध केली. दुसऱ्या दिवशी तरुणी घरी पोहचली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. तरुणीला घेऊन ती महिला पोलीस ठाण्यात पोहचली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुकेशला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rickshaw driver who kidnapped and raped a mentally retarded girl in nagpur was arrested adk 83 dpj