वर्धा : समुद्रपुर तालुक्यातील ताडगाव शिवारात भ्रमण करीत असलेला वाघ अखेर नजरेच्या टप्प्यात आला आहे. गुरुवारी रात्री तो कॅमेरा ट्रॅपमध्ये सापडला. त्याने एका रानडुकराची रात्री शिकार केल्याचेपण दिसून आले आहे. त्याला बेशुद्ध करीत ताब्यात घेण्यासाठी ताडोबा अभयारण्याचे डॉ. रवी खोब्रागडे घटनास्थळी दाखल झाले आहे, अशी माहिती जिल्हा वन अधिकारी सेपट यांनी दिली आहे. सोमवारी या वाघाने गोविंदा चौधरी या शेतकऱ्यास फरफटत नेत ठार केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – विदर्भात राष्ट्रवादी न वाढण्यास प्रफुल्ल पटेलच जबाबदार, अनिल देशमुखांनी सुनावले

हेही वाचा – खबरदार..! मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्यास…; विदर्भातील कुणबी संघटना आक्रमक

ताडगाव पासून एक किलोमीटरच्या परिघात वाघाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो कुठून आला, याविषयी अनभिज्ञता आहे. मात्र सलग दोन दिवस त्याच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याने पंचक्रोशीत चांगलीच दहशत पसरली आहे. वाघाचा त्वरित ताबा घेण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.