नागपूर : शाळकरी मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आईने तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलगी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. कुणीतरी मुलाच्या प्रेमात पडल्याचा संशय आईला आला. मात्र, तिने शेजारी राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीकडून गर्भवती असल्याचे सांगताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने गर्भवती मुलीसह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. संजय आत्माराम तायडे (५२) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित १५ वर्षीय मुलगी आईसह राहते. आई खासगी काम करते. त्यामुळे मुलगी नेहमी एकटी घरी असते. याच संधीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या संजय तायडे यांची वाईट नजर मुलीवर होती. तो विनाकारण मुलीच्या घरी येऊन चहा-पाणी घेत होता. अनेकदा मुलीला बिस्कीट-चॉकलेट देऊन गोडीगुलाबी लावत होता. संजय हा एका कंपनीत काम करतो. त्याला पत्नी व दोन मुले आहेत.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Devendra Fadnavis, Devendra Fadnavis visit to Nagpur,
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा पहिला नागपूर दौरा ठरला, स्वागताची जय्यत तयारी
Ashwini Kalsekar On Not Having Kids
“तेव्हा सरोगसीची फॅशन नव्हती अन् पैसेही नव्हते…”, मूल नसण्याबाबत मराठमोळ्या अश्विनी काळसेकर यांचे वक्तव्य

हेही वाचा – वर्धा : नागरी बँकेच्या सायबर दरोड्याप्रकरणी ‘जामतारा’ व ‘नायजेरीयन’ संबंध उघड!

वडिलासमान असलेला शेजारी हा नेहमी घरी ये-जा करीत असल्यामुळे मुलीच्या आईला कधीच त्याच्या वागणुकीवर संशय आला नाही. गेल्या जानेवारी महिन्यात १७ तारखेला मुलगी घरात कपडे बदलत होती. त्यावेळी संजय हा तिच्या घरी आला. त्याने मुलीला जवळ ओढले आणि अश्लील चाळे करायला लागला. त्याने मुलीला शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलीने रडायला सुरुवात केली. मात्र, त्याने तिला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. आईला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिने आईला सांगितले. आईने डॉक्टरकडे गेल्यानंतर ती तब्बल चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. तिने संजय तायडे यांनी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती आईला दिली. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.

Story img Loader