भंडारा : ‘सांग.. सांग.. भोलानाथ पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय…?’ हे गीत बालकांच्या मुखातून पावसाळ्यात ऐकायला मिळायचे. बालकांचे म्हणणे देवाने ऐकले व खरोखरच पाऊस येवून शाळेभोवती तळे साचले आणि शाळेला सुट्टी मिळाल्याचा प्रकार लाखांदूर तालुक्यातील विरली / बु. गावात १२ जुलै रोजी पहावयास मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसाने तालुक्यातील नदी, नाले भरून वाहत असून शाळेच्या आवारात सर्वत्र पाणी जमा झाल्याने विरली/बु येथील शाळेला १२ जुलै रोजी सुट्टी द्यावी लागली.

हेही वाचा – ताडोबात ‘मस्ती की पाठशाला,’ बबलीच्या बछड्याची धमाल मस्ती

हेही वाचा – अकोला : ‘‘सोन्यासाठी खून झाला, तुमच्या अंगठ्या आमच्याजवळ द्या’’, पोलीस असल्याचे सांगत वृद्धाला लुटले

लाखांदूर तालुक्यात पावसाने चांगलीच मुसंडी मारली असल्याने सर्वच नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशा सततच्या पावसामुळे विरली / बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात जवळपास गुडघाभर पाणी जमा झाले. बुधवारी सकाळच्या सुमारास विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी शाळेत हजेरी लावली. मात्र शाळेच्या आवारात पाणी साचले असल्याने खबरदारीचा इशारा म्हणून मुख्याध्यापक जी. एम. वंजारी यांनी गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी त्यांनी सतर्कता दाखवीत शाळेला सुट्टी जाहीर केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A school in virli had to be closed due to water accumulation in the school premises ksn 82 ssb
Show comments