नागपूर : अकरावीच्या विद्यार्थिनीचे एका स्कूलव्हॅन चालक गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक शोषण करीत होता. त्याने आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीला दहशतीत ठेवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. शेवटी त्याचा त्रास सहन न झाल्यामुळे तिने कुटुंबियांना सांगितल्याने या प्रकाराचा उलगडा झाला. अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन स्कूलव्हॅनचालकाला अटक केली. गिरीश रामटके (६०, अजनी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रिटा (बदललेले नाव) ही शहरातील एका नामांकित शाळेत अकराव्या वर्गात शिकते. तिचे वडिलसुद्धा चालक म्हणून काम करतात. तिच्या वस्तीत आरोपी गिरीश रामटके हा राहतो. तो अविवाहित असून वृद्ध आईसोबत राहतो. त्याने आईला सांभाळायला केअरटेकर महिला ठेवली आहे.  रिटाच्या वडिलाशी गिरीशची मैत्री आहे. त्यामुळे तो नेहमी घरी येत होती.

vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
rape news kanpur
आधी मद्य पाजलं, मग मित्रांसमोर नाचायला भाग पाडत केला बलात्कार; IIT कानपूरच्या इंजिनिअर महिलेवर अत्याचार
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
class 6 girl school raped in Porbandar
शिक्षकाचा सहावीतल्या विद्यार्थीनीवर बलात्कार; वाच्यता केल्यास खिडकीतून फेकण्याची दिली होती धमकी
Three youths arrested for abusing a college student in Tathawade pune news
पिंपरी: ताथवडेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर अत्याचार; तीन तरुण अटकेत
daund taluka , school girl rape contract ,
धक्कादायक! विद्यार्थिनीवर बलात्कार आणि खून करण्यासाठी विद्यार्थ्याने दिली १०० रुपयांची सुपारी
Teacher gets 5 years in jail for molesting girls
अश्लील कृत्य करणाऱ्या शिकवणी चालकाला सक्तमजुरी

हेही वाचा >>>पतीच्या निधनानंतर मुलीसाठी लग्न केले नाही, कष्ट उपसले, पण तरुण होताच मुलीने…

रिटाचा तो नेहमी लाड करायचा. तिला नेहमी खायला चॉकलेट किंवा खाऊ आणत होता. त्यामुळे रिटासुद्धा त्याच्याशी बोलत होती. तिला तो अनेकदा शाळेत सोडून देत होता. मात्र, गिरीशची वाईट नजर रिटावर होती. त्यामुळे तो नेहमी तिला बघायला घरी येत होती. १ मे २०२४ ला तो रिटाच्या घरी आला. त्यावेळी तिच्या घरी कुणी नव्हते. त्यामुळे त्याने रिटाला चॉकलेट दिले आणि अश्लील चाळे केले. गिरीशचे कृत्य बघून ती घाबरली. तिने लगेच हाताला झटका देऊन घराबाहेर पळ काढला.

त्याने तिची समजूत घालून कुणालाही प्रकार न सांगण्याचा दम दिला. काही दिवसांनंतर तो पुन्हा रिटाच्या घरी आला. त्याने घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत बळजबरीने रिटावर बलात्कार केला. त्यामुळे रिटा घाबरली आणि रडायला लागली. त्यामुळे त्याने तिला आई-वडिलांचा खून करण्याची धमकी दिली. त्यामुळे रिटा घाबरली. तिने बलात्काराची घटना कुणालाही सांगितली नाही. त्यामुळे तो वारंवार तिचे लैंगिक शोषण करीत होता.

हेही वाचा >>>अकोला : सावधान! ४.८१ लाख वाहनांवर तब्बल २३.७८ कोटी थकीत, फौजदारी कारवाई…

बलात्कारानंतर वागणुकीत बदल

गिरीशने रिटावर केलेल्या बलात्कारानंतर तिच्या वागणुकीत बदल झाला. मात्र, आईवडिलांच्या तो लक्षात आला नाही. गिरीशचा वाढता अत्याचार तिला सहन होत नव्हता. तब्बल सहा महिने ती गिरीशचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. गिरीश घरी आल्यानंतर ती घाबरायला लागायची. शेवटी आईने तिची आस्थेने विचारपूस केली. ती रडायला लागली. तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. त्याने लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Story img Loader