यवतमाळ : देशी बनावटीचे अग्निशस्त्र बाळगून असणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यवतमाळ येथे आंबेडकरनगर ते डोर्ली मार्गावर केली. सिद्घार्थ वासुदेव गायकवाड (३०), लखन उर्फ जानी विजय चंदेल (२८), दोघेही रा. सेवानगर, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना दोघे जण अग्निशस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच घटनास्थळी धाव घेतली. आंबेडकर चौक ते डोर्ली रोड दरम्यान असलेल्या नगर पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाजवळ संशयित आढळले. त्यांची विचारपूस केली असता, ते गडबडले. अंगझडती घेतली असता सिद्घार्थकडे देशी बनावटीची मॅग्जीनला काळ्या रंगाचे फायबर कवर असलेली ५० हजार रुपये किमतीची पिस्टल तर लखनच्या खिशात एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस आढळून आले.

navi mumbai firing
नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Two arrested for illegally carrying pistols
बेकायदा पिस्तूल बाळगणारे दोघे अटकेत
2 arrested for firing in Theur
थेऊर गोळीबार प्रकरणातील पसार आरोपी अटकेत
shahapur two Arrested Uttar Pradesh bullion shop worker murder
सराफाच्या दुकानातील कामागाराची हत्या करणाऱ्यास उत्तरप्रदेशातून अटक, दोन आरोपींचा शोध सुरू
Gun fire near Sanpada station , Sanpada station,
नवी मुंबईतील थरारक घटना, वर्दळीच्या ठिकाणी ५ राऊंड फायर करून दुक्कल फरार
Tree cutting in Thane case registered against four people
ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल
thane city fire incidents last year
ठाणे शहरात वर्षभरात आगीच्या ८०८ घटना

हेही वाचा >>> बालिकेवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, उमरखेडमध्ये रास्ता रोको

दोघांकडून ५१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्घ यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात संतोष मनवर, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, यवतमाळ शहरचे सपोनि संजय आत्राम, अन्सार बेग, प्रदीप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे आदींनी केली.

Story img Loader