यवतमाळ : नवीन इलेक्ट्रिक मीटर बसविण्यासाठी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला भोवले. ही रक्कम स्वीकारताना तंत्रज्ञास रंगेहात अटक करण्यात आली. आर्णी मार्गावरील सहकार भवनजवळ झालेल्या या कारवाईने वीज वितरण वर्तुळात खळबळ उडाली. गजानन मारोतराव भोयर (३५, रा. विश्‍वासनगर, वडगाव रोड), असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. तो वडगाव येथील वीज वितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहे.

यवतमाळ येथील रेणुकानगर, दांडेकर ले-आउटमधील तक्रारदार तरुणाला नवीन वीजमीटर बसविण्यासाठी गजानन भोयर याने ४५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मंगळवारी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सहकार भवन बाजूला असलेल्या स्वामी अ‍ॅक्वाजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच भोयर याला ताब्यात घेण्यात आले.

Court orders housing societies to implement policy regarding e charging stations Mumbai news
ई-चार्जिंग स्टेशनबाबतचे धोरण अमलात आणा;  गृहनिर्माण संस्थांबाबत न्यायालयाचे आदेश
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chhatrapati Sambhajinagar, water , arrears ,
छत्रपती संभाजीनगरमध्ये नळजोडणीची १२१ कोटींची थकबाकी
Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
thief stealing mobile phones from passengers at swargate st station arrested
एसटी स्थानकात प्रवाशांकडील मोबाइल चोरणारा गजाआड; ४३ मोबाइल संच जप्त

हेही वाचा – गडचिरोलीच्या हजारो शेतकऱ्यांचे चंद्रपूरात ठिय्या आंदोलन, हत्ती आणि वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हेही वाचा – नागपूर : विवाहितेची आत्महत्या; मैत्रिणीचा पैशांसाठी तगादा

याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात लाचखोर कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, उपअधीक्षक उत्तम नामवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमित वानखडे, विनायक कारेगावकर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, महेश वाकोडे, राकेश सावसाकडे, इफराज काजी आदींनी केली.

Story img Loader