वर्धा : सणासुदीच्या दिवसात हार, दुर्वा, फुले, बेल व देवास अर्पण अन्य वस्तू कचरा ठरू नये म्हणून येथील शिवमंदिर भगिनी मंडळाने पुढाकार घेतला. हे निर्माल्य वहन करीत त्याची योग्य विल्हेवाट लागावी असा हेतू होता. तसे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आल्यावर तत्पर प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा – हवामान खात्याचे अंदाज का चुकतात? अत्याधुनिक यंत्रणा असूनही उपयोग…
हेही वाचा – नागपुरातील पुरात दहा हजार घरांचे नुकसान, फडणवीसांचा दौरा, मदतीचे आश्वासन
पालिकेने आजपासून पुढे गणपती विसर्जनपर्यंत स्वतंत्र गाडीची सोय केली आहे. शहरातील सर्व मंदिरे, प्रमुख चौक या ठिकाणांहून निर्माल्य गोळा केल्या जाणार आहे. शिव मंदिरातून सुरवात झालेली आहे. यामुळे निर्माल्याचा अपमान न होता त्याचे पावित्र्य राखल्या जाईल, अशी भावना यासाठी पुढाकार घेणाऱ्या रंजना सुरेश पट्टेवार तसेच सविता श्याम वैद्य, सुनंदा लाखे, शकुन नीमजे, शारदा दाते यांनी व्यक्त केली. मनीषा बंडोपिया, मंदिराचे चंद्रकांत मुडे, किशोर लाखे, उमेश नागपूरकर आदींनी पालिका प्रशासक राजेश भगत तसेच भाग्यश्री बोरकर, विशाल सोमवंशी यांचे आभार मानले.